डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त नवीन इलेक्ट्रिक बोअरचे उद्घाटन

नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा उपक्रम

 प्रतिनिधी
सोलापूर : प्रभाग क्र. २६ अ कोनापुरे चाळ येथे जयभारत तरूण मंडळ शेजारी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे व स्थानिक प्रभागातील महिला यांच्या हस्ते नवीन इलेक्ट्रीक बोअरचे उद्घाटन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत्या पाण्याची टंचाई लक्षात घेवून प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी आपल्या विकास निधीतून नवीन इलेक्ट्रीक बोअर घेण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे जॉन फुलारे, रवि असादे, बाबू बलझेंडे, जॉन अलझेेंडे, नागनाथ म्हेत्रे, राजू दिवेकर, मंगेश शिंदे, सायबण्णा दिवटे, जीवन शिंदे, किर्तीपाल जाटला, रोहित गुळेकर, राजू बेरे, जयराज शासन, स्थानिक महिला लक्ष्मी भंडारे, सुलोचना दिलपाक, नागूबाई गायकवाड, पदमा म्हेत्रे, आशा होसमनी, रंजना शिंदे, सुमन पाटोळे आदी कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन जॉन फुलारे यांनी केले. आभार प्रदर्शन शहाजी गायकवाड यांनी केले.

Source – Dainik Ekmat

Related posts