डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करावे -प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

ambedkar-ashwin-mudgal-satara-atozsataranews-min-696x383

सातारा दि. 13 –  लोकशाही मुल्यांच्या सबलीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आज केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती,समता व सामाजिक न्याय वर्ष निमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यावतीने राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आज येथील नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. पाटणे मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी पी.बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, उपजिल्हाधिकरी (महसूल) भारत वाघमरे, तहसीलदार चंद्रशेखर सानप आदी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या सुरुवातीला जिल्हाधिकरी श्री. मुद्गल यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यशाळेत प्रा. डॉ. पाटणे पुढे म्हणाले, समाज जीवनाचा तोल ढासळतो, निती तत्वांचा ऱ्हास होते, माणसाला नेमका धर्मच समजत नाही, अशा काळात महापुरुष मानवतेची, समतेची, सामाजिक न्यायाची मुल्य पेरत असतात. समाजिक न्यायासाठी आयुष्य वेचणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दुख:च्या मुलखातील प्रकाश यात्री होते.

बहुजन, दिनदलित समाजाच्या वाट्याला अज्ञान, दारिद्र्य आणि वर्णवर्चस्वतेमुळे जे दुख जन्माला आहे. त्याच्या निवारणासाठी डॉ. आंबेडकरांनी लढा दिला. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह, सामाजिक गुलामगिरीचा निषेध आणि मानव प्रतिष्ठा ही त्यांची विचार प्रणाली होती. सामाजिक समतेसाठी संघर्ष करणारे डॉ. आंबेडकर हे मानव जातीचे संजीव शक्तीस्थान आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि सहकार्य या तत्वावर आधारित आदर्श समाज व्यवस्था उभी रहावी म्हणून डॉ. आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली. लोकशाही मुल्यांच्या सबलीकरणासाठी डॉ. आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यावेळी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण साताऱ्यात           झाले.  देशाचे राजकीय, सामाजिक परिस्थिती पाहून दूर दृष्टी ठेवून भातररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोच्च घटना लिहिली. या राज्य घटनेच्या माध्यमातून लोकशाहीची स्थापना झाली. भगवान गौतम बुद्धांनी दिलेले उद्देश तंतोतंत आपण लागू करु शकतो. सर्वसामान्य लोकांना प्रमाणिकपणे न्याय देण्यासाठी सम्यक दृष्टी संविधा प्रत्येकाने वाचायला हवी. याच राज्य घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत विकासाच्या योजना पोहचविल्या पाहिजेत, ही जाणीव सातत्याने ठेवूया.

समाज कल्याणचे सहायक आयुक्त रवींद्र कदम-पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाज कल्याणचे विशेष अधिकारी सचिन साळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. या कार्यशाळेला विविध विभागांचे राजपत्रित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source – Satara News

Related posts