डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन

मिशन ओळख (Mission Introduction)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवताभूषण, समताभूषण, विश्वभूषण ठरावं असं भारतभूमीचं अनमोल रत्न! घटनाकार, ज्ञानवंत, किर्तीवंत, लढवय्या, समतायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! डॉ. भीमराव रामजी आंबेडकर…

डॉ. बी. आर. आंबेडकर या महामानवाच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाच्या अलौकिकतेचा किती म्हणून गौरव करावा? शब्दच अपुरे पडणार..! त्यांच्या प्रकांडपांडित्याच्या विचारवैभवाचं इंद्रधनू नि त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमहात्म्य…! विद्वत्तेचं अद्भूत रसायन… ज्ञनाचा महासागर, आकाशाला गवसणी घालू पाहणाया चिंतनाचा महामेरू…समताधर्मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथलेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदर्श अध्ययनार्थी – विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशभक्त – राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंदोलक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नितीनिपूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मचिकित्सक डॉ. बाबासाहेब आंबेडकर … अशा अनेक ज्ञानपैलूंनी पुनीत झालेलं हे प्रज्ञावंत देशवैभव व बहुजनदैवत!

Dr-Babasaheb-Ambedkar-Knowledge-mission

त्यांच्या या बहुआयामी ज्ञानवैभवाची ओळख करून देणारी ज्ञानसंपन्न ग्रंथमालिका आम्ही प्रकाशित करण्याचा मानस देशभूषण नि समताभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हाती घेण्याचे अभिमानास्पद धाडस केलं आहे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आम मराठी जनतेला सादर केलेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली ज्ञानांजली असणार आहे. येत्या एप्रिल/मे २०१६ मध्ये १२ पुस्तकांचा पहिला संच प्रकाशित करण्याचं ध्येय ठरविलं आहे.

बहुजननायक डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि विविधांगी पैलू समाजातील सर्व थरांमध्ये पोहोचविण्याचं हे मीशन आहे. अत्यंत अल्प किंमतीत, अत्यंत दर्जेदार आणि नामांकित अभ्यासू संशोधक-लेखकांकडून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैलूंवर ग्रंथलेखन करून घेत आहोत. त्याला हवाय तुमचा भरघोस प्रतिसाद! फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या अनुयायांचे कृतिशील पाठबळ..! आपण हा आगळावेगळा ग्रंथप्रकल्प पाहून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाल याची खात्री आहे..! आपण या १२ पुस्तकांच्या संचाचं ‘अॅडव्हान्स बुकींग’ करून (तीन हजारांच्या ग्रंथसंचाची प्रकाशपूर्व किंमत रु. दोन हजार फक्त) आम्हास आपलं बळ द्या, एवढंच मागणं आहे.

ग्रंथमालिकेतील पुस्तके व लेखक

1) शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – पद्मश्री डॉ. यू. म. पठाण, औरंगाबाद.

2) नवसंस्कृतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. डॉ. यशवंत मनोहर, नागपूर.

3) अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे, औरंगाबाद.

4) राज्यशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्राचार्य डॉ. व्हि. एल. एरंडे,निलंंगा-लातूर.

5) समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. डॉ. प्रदिप आगलावे, नागपूर.

6) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर – पत्रकार बी. व्ही. जोंधळे, औरंगाबाद.

7) जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. डी. टी. गायकवाड, पुणे.

8) राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. भूषणकुमार जोरगुलवार, लातूर.

9) संरक्षणविषयक तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. डॉ. विजय खरे, पुणे.

10) विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. विजयकुमार पोटे, अहमदनगर .

11) प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. संभाजी खराट, मुंबई.

12) कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे, वर्धा.

जनाधारित सत्त्वशील-स्वाभिमानी ज्ञाननिर्मिती मीशन

»  बहुजननायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मीशन हे कुठल्याही बड्या उद्योगपतीच्या विंâवा धनवानाच्या आशिर्वादाने-आधाराने चालणार नाही! चाललेलं नाही. पुâले-शाहू-आंबेडकरी विचार नि बहुजनांचा आधार हीच आमची शक्ती आहे. म्हणूनच आम्ही याला सत्वशील-स्वाभिमानी बहुजन जागृती मिशन मानतो.

»  या मिशनसाठी कोणताही राजकीय पक्ष विंâवा नेता यांचे आर्थिक पाठबळ घेतले जाणार नाही.

»  हे मिशन या महान बहुजननायकाच्या विचारांच्या प्रसारासाठी तसेच केवळ आणि केवळ पुâले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या नागरिक व जनतेच्या पाठबळावरच काम करणार आहे.

»  या मिशनसाठी कुणाकडूनही एक रुपयाची देखिल देणगी घेतली जाणार नाही.

»  हे संपूर्णपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानप्रसाराचं स्वाभिमानी मीशन असणार आहे. याचे सर्व लेखक सर्व जातीधर्माचे राहतील.

»  बहुजनांच्या आणि पुरोगामी विचारांच्या जनतेच्या कृतिशील प्रोत्साहनावरच हे मीशन स्वाभिमानानं चालेल.

»  समाज सर्वश्रेष्ठ आहे आणि विचारांची भक्ती महान आहे! यावर नितांत श्रद्धा ठेऊनच हे मीशन काम करणार आहे.

»  महाराष्ट्रातील एक पुरोगामी वक्ते व विचारवंत, लेखक, पत्रकार आणि प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या संकल्पनेतून हे मीशन उभे राहिले आहे. ती त्यांचीच ‘मीशन आयडिया’ आहे. ‘नामांतर लढा: एक शोधयात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, धर्मांतर (नाटक) या लेखनातून त्यांची ओळख सर्वांना आहेच. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे ते लढवय्ये समर्थक आहेत.

»  भारतामधील हिंदी या राष्ट्रभाषेसह इतर भाषांमध्येही हा ग्रंथ संच प्रसिद्ध करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. मराठीतीतल गं्रथसंच प्रकाशनानंतर आम्ही इतर भाषांतील प्रकाशन कार्यास लागू.

»  १२ पुस्तकांची पहिली ग्रंथमाला एप्रिल /मे २०१६ मध्ये प्रकाशित केल्यानंतर डिसेंबर २०१६ पर्यंत पुन्हा १३ मराठी पुस्तकांची ग्रंथमाला खंड-२ प्रकाशित करण्याचे स्वप्न आम्ही पाहतो आहोत.

»  या मिशन अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व त्यांच्या विविध पैलूंवर एवूâण २५ ग्रंथ प्रकाशित करावयाचे आहेत… हा आमचा महासंकल्प आहे..! फसे कधी झाले नाही! ते आम्ही धाडसाने करू इच्छितो.

»  हा आहे महामानवाच्या ज्ञानप्रसाराचा महासंकल्प…महाप्रकल्प..! बहुजननायकाचा व राष्ट्रनायकाचा गुणगौरव गान..!

ग्रंथ खरेदी प्रक्रिया / अॅडव्हान्स बुकींग

बहुजननायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२ ज्ञानपैलूंचे दर्शन घडविणाऱ्या दर्जेदार लेखकांनी लिहिलेल्या उत्तम दर्जाच्या १२ पुस्तकांची खरेदी प्रक्रिया याप्रमाणे राहील!

1) ग्रंथमालिकेतील १२ पुस्तकांच्या संचाची किंमत रु. ३०००/- (तीन हजार रुपये फक्त) असणार आहे आणि अॅडव्हान्स बुकींग ३१ मार्च २०१६ पर्यंत चालणार आहे. अॅडव्हान्स बुकींग केवळ रु. २०००/- (दोन हजार रुपये फक्त) केले जाणार आहे. ही भरघोस सवलत आहे.

2) एप्रिल / मे २०१६ मध्ये आपणास हा मौल्यवान ग्रंथसंच घरपोच कुरीअर सव्र्हिसद्वारे खात्रीने पोहचविला जाणार आहे.

3) अॅडव्हान्स बुकींग करण्यासाठी किंवा ग्रंथरखरेदीसाठी आपणास इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगचा उपयोग करावा लागणार आहे. आपल्या खात्यावरून अॅडव्हान्स बुकींगची रक्कम आपणास मीशनच्या खात्यावर जमा करता येईल. त्याची रीतसर पावती तसेच एसएमएस आपणास प्राप्त होईल.

4) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी (३५ जिल्हे व ३५६ तालुके) तसेच मोठ्या शहरातील विभागांमध्ये आम्ही या मीशनचे ‘डॉ. आंबेडकर अॅम्बॅसेडर’ (डॉ. आंबेडकर दूत) नेमणार आहोत. हे डॉ. आंबेडकर दूत फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील प्रामाणिक व निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते राहणार आहेत. त्यांच्याद्वारेच ग्राथविक्री होणार आहे. आपण अॅडव्हान्स बुकींग थेटही करू शकता किंवा आपल्या जवळच्या गावातील डॉ. आंबेडकर अॅम्बॅसेडरच्या माध्यमातूनही करू शकाल.

5) आपण चेक / डीडी देणार असाल तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मीशन प्रकाशन’ या नावाने औरगाबाद येथे देय असलेला द्यावा किंवा मीशनच्या खात्यावर थेट पैसे जमा करू शकता.

बॅक : बॅक ऑफ महाराष्ट्र, शाखा – सिडको, औरंगाबाद.
खाते क्र. : 60243659764.
आयफसी कोड : MAHB0000938

अधिक माहितीसाठी संपर्क :

डॉ. सुधीर गव्हाणे  – +91 9096950035

(प्रकल्प संचालक आणि ग्रंथमालिका संपादक)

वेबसाइट – http://ambedkarknowledgemission.com/

Related posts