डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती पनवेल नगरपरिषदेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

पनवेल (प्रमिला जोशी): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त पनवेल नगर परिषदेच्यावतीने दिनांक 14 ते 16 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा चारूशिला घरत यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल (प्रमिला जोशी): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त पनवेल नगर परिषदेच्यावतीने दिनांक 14 ते 16 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा चारूशिला घरत यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या या परिषदेस ज्येष्ठ नगरसेवक जयंत पगडे, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभपाती सीता पाटील, मागासवर्गीय कल्याण समितीचे सदस्य प्रकाश बिनेदार, नगरसेवक शिवदास कांबळे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा चारूशिला घरत यांनी पत्रकारांना माहिती देताना पुढे सांगितले की, गुरूवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ धार्मिक विधी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येर्इल. त्यानंतर त्याच ठिकाणावरून चित्ररथ, ढोल, लेझिम पथकासह पनवेल शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक होर्इल.

दिनांक 15 एप्रिलला शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याचे उदघाटन सकाळी 10 वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन आयाजित करण्यात आले असून “भारताचे संविधान” या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 6 वाजता “भारताच्या आर्थिक व नियोजनातील जल व विद्युत धोरणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान” या विषयावर पुणे येथे अॅड. दिलीप काकडे यांचे व्याख्यान होणार आहे.

दिनांक 16 एप्रिलला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगॄहात पर्यावरणाचं समतोल, पाणी वाचवा, लेक वाचवा, व्यक्तीचित्र या विषयांवर रांगोळी स्पर्धा तसेच सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा भिमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 06 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे उपविभागीय अधिकारी भरत शितोळे, तहसीलदार दीपक आकडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल बाजारे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पनवेल व परिसरातील कला, क्रीडा, सांस्कॄतिक, वंचित घटकांसाठी कार्य, शैक्षणिक, पत्रकारिता, कामगार, महिला सक्षमीकरण, विधी तज्ञ, सामाजिक, वैद्यकीय या क्षेत्रात योगदान देणाऱ्या 125 मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि निबंध, काव्यवाचन व वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, अशीही माहिती नगराध्यक्षा चारूशिला घरत यांनी पत्रकारांना दिली.

Source – The Real News

Related posts