पिंपरी महापालिकेत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त रेखाटली सुरेख रांगोळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त राजश्री जुन्नरकर या रांगोळी कलाकाराने सुरेख रांगोळी रेखाटली आहे, जी महापालिका इमारतीत येणा-यांना आकर्षित करत आहे.

Rangoli

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी चौकातील त्यांच्या पुतळयास महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बु आसवानी व आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, पिंपरी येथे आज (सोमवारी) सकाळी झालेल्या या कार्यक्रमास विधी समिती सभापती नंदा ताकवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता मंचरकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासुळकर, शिक्षण मंडळ सभापती चेतन भुजबळ, क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्ष आघाडीचे गटनेते सुरेश म्हेत्रे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्य वसंत लोंढे, गोरक्ष लोखंडे, नगरसदस्या मंदा आल्हाट, माजी शिक्षणमंडळ सभापती विजय लोखंडे, शहर अभियंता एम.टी.कांबळे, सहाय्यक आयुक्त दत्तात्रय फुंदे, नगरसचिव उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता रविंद्र दुधेकर आदी उपस्थित होते.

 

महात्मा ज्योतीबा फुले यांची आज (सोमवार) 189 वी जयंती आहे, तर गुरुवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती आहे. या दोन महापुरुषांच्या शतकोत्तर जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका व शहर परिसरात दि.11 ते 15 एप्रिल दरम्यान वाचन स्पर्धा, व्याख्याने, महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांवर आधारीत नाटीका, पुस्तक प्रकाशन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  दरवर्षीपेक्षा यावर्षी जयंती महोत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Source – MPC News

Related posts