स्वातंत्रोत्तर परिवर्तनवादी चळवळीतील स्त्रिया

हजारो वर्ष गुलामगिरीत असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला त्यांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लढ्याचे रणशिंग फुंकले त्या लढ्यात  पूर्वापार पारतंत्र्यात असणाऱ्या व  अस्पृश्य   असणार्यांचा समावेश होता बाबासाहेबांच्या ह्या चळवळीला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान प्राप्त झाले.

महिला या जास्त शोषित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत.स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळी बाबासाहेबांना स्त्रियांचे स्वातंत्र्य  अधिकारहि महत्वाचे वाटत होते ,त्यांनी निर्माण केलेल्या परिवर्तनवादी  चळवळीच्या पायाभरणीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आणि ” मैलाचा दगड ” ठरला .

स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस, गांधीन बरोबर अनेक महिला होत्या, पण त्यांचा उद्देश हा कुणाला तरी घालवून कुणाचे तरी राज्य आणण्याचा होता, मात्र अस्पृश्य समाजातील स्त्रियांचा लढा हा स्वतः बरोबरच स्वताच्या समूहाची अस्मिता दाखून देण्याचा, जातीव्यवस्था झुगारून माणसाला माणुसकी बहाल करण्याचा होता .

5

महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो, काळाराम मंदिर प्रवेश असो, पार्वतीचा सत्याग्रह असो दुसर्या गोलमेज परिषदेत आरक्षणाच्या  समर्थनच तसेच स्वतंत्र मतदार संघाचा लढा असो प्रत्येक लढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला चळवळीत सक्रिय होत्या बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या सामाजिक समतेच्या चळवळीला अतिशय मोलाची साथ इथल्या अस्पृश्य वर्गातील महिलांनी दिली .

इतर चळवळीपेक्षा बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या स्त्रियांच्या परिवर्तनवादी चळवळ वेगळी आहे .रूढी ,परंपरा सोडल्या पाहिजेत,स्त्रियांना समान अधिकार नकारणार्य धर्माला सोडले पाहिजे हे विचार स्त्रियान मध्ये दृढ करण्यचे काम परिवर्तनवादी चळवळीने केले .

आज पर्यंत सवर्ण स्त्रियांना हि जाणीव नव्हती कि धर्माने आपल्याला क्षुद्र समजले जातेय ,पण सर्वात आधी हि जाणीव परिवर्तनवादी चळवळीतील स्त्रियांना झाली आजपर्यंत स्त्रिया मूकपणे मागे चालणाऱ्या होत्या पण परिवर्तनवादी चळवळीने स्त्रियांना आत्मभान आले,आपल्यासाठी कुणीतरी लढणारे आहे,आपण पाठीमागे  चालावे ह्या पेक्षा आपल्यासाठी लढणार्यांचे  हात आपण बळकट करू शकतो हि जाणीव त्यांच्यात बाबासाहेबांनी निर्माण केली .

आंदोलनात स्त्रियांचे प्रमाण वाढत गेले .गिरणी कामगारांचा प्रश्न स.महाराष्ट्र चळवळ ,भूदान चळवळ,आदिवासींची आंदोलने अशा आंदोलनात स्त्रिया उतरू लागल्या. १९५६ नंतर स्त्रियांची परिवर्तनवादी चळवळ वेगवेगळ्या प्रकारे व्यापक होऊ लागली.स्त्रियांची साहित्यनिर्मिती,लोककला,शाहिरी जलसे,गायकी या माध्यमातून चळवळ वाढत गेली.

बाबासाहेबांनी दिलेल्या लेखन अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे स्त्री- विश्वाची जाणीव असणाऱ्या स्त्री  लेखिका स्त्रियांचे भावविश्व ,त्यांची मत मतांतरे,व्यवस्थेचा त्यांच्यावरील पगडा,जुलुमी बंधने,त्यांच्या विरोधात पुकारलेले बंड ह्याबद्दल अधिक परखडपणे मांडू लागल्या.साहित्यामध्ये परिवर्तनवादी स्त्रियांची वेगळी चळवळ उभी राहिल्याने साहित्यात स्त्रीवादी साहित्याचा वेगळा प्रवाह निर्माण झाला.गायकी व लोककलांच्या माध्यमातून स्त्रियांनी परिवर्तनवादी विचार लोकांना समजतील,पटतील अशा भाषेत लोकांसमोर मांडले.खेडोपाडी,अडाणी असणाऱ्या अनेक स्त्रियांच्या ओव्यांमध्ये परिवर्तनवादी विचार  गुंफले जाऊ लागले.लोकसाहित्याच्या माध्यमातून स्त्रिया विचार मांडत.त्यांच्या तोंडात बाबासाहेबंविषयी आत्मीयता व्यक्त करणारी अनेक कवन असत.

साठीच्या दशकात चळवळीतील पार्वतीबाई धोंडीबा खरात नागपंचमीच्या गाण्यातून बाबासाहेबंविषयी  कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात….

                        ओवाळूया पाळी पाळी ग

                        सयानो धरूया जाळी ग

                        अरे तू नागराया

                        धरी भीमावर  छाया

                       आम्हा दुखीतांचे दुख तो टाळी

                       सयानो धरूया जाळी ग

शिक्षणाने अडाणी पण परिवर्तनवादी विचारसारणी  असलेल्या अनेक ज्ञात अज्ञात स्त्रियांनी परिवर्तनवादी चळवळ पुढे नेण्याचे काम आपापल्या परीने केले. नामांतराचा लढा,तसेच अनेक सामाजिक लढयांमध्ये अनेकजण  हुतात्मा झाले तरीही स्त्रियांनी आपला  परिवर्तनवादी विचार सोडला नाही. एकप्रकारचे आत्मिक बल बाबासाहेबांनी ह्या स्त्रियांना दिल्यामुळे त्यांच्यामध्ये धाडसीपणा आला.प्रसंगी लाठीमार सोसूनहि त्या माघारी फिरल्या नाहीत. एक असाच प्रसंग इथे सांगावा वाटतो-

बाबासाहेबांनी अनेक  परिवर्तनवादी  कायदे मांडून संमत करून घेतले त्यामुळे अनेक नतद्रष्टाना पोटशूळ होतच .एका सभेत झालेल्या दगडफेकीच्या वेळी बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून एका दोम्बारानीने काठी फिरवण्याच्या तिच्या कलेतून आलेले दगड भिराकौन लावले व बाबासाहेबांचे संरक्षण  केले,

या प्रसंगातून स्त्रीचे धाडशी दिसते व आपला स्त्रियांचा तारणहार असणाऱ्या बाबासाहेबा विषयीची आत्मीयता हि दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रियांना परिवर्तनवादी चळवळीमुळे राजकीय आत्मभान आले “.सत्तेच्या जागा काबीज करा  ,समूहाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे बळ मिळते ते त्यामुळे तुम्हाला न्याय मिळवून घेत येतो ” या बाबासाहेबांच्या विचारांमुळे राजकीय दृष्ट्या आपण सक्षम झाले पाहिजे हे आत्मभान चळवळीतील स्त्रियांना आले .एकूण राष्ट्रहितासाठी ,समाजहितासाठी आणि मानाविमुल्याना धरून उत्कर्ष व प्रगतीकडे नेणाऱ्या योजना व कायदे संमत होण्यासाठी राजकीय पकड गरजेची आहे याचे महत्व महिलांना कळू लागले. महिलांमध्ये राजकीय प्रगल्भता आली .राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला /निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सर्वसाधारण तळागाळातील स्त्रियांचा सहभाग पुरुषान पेक्षा जास्त प्रमाणात असताना आपल्याला आजही दिसून येतो.कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात महिलांचे प्रमाण नगण्य आहे .

बाबासाहेबांनी हिंदू -कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रीलाही पुरुषांच्या समान सर्वाधिकार आहेत हे मांडले. स्त्रिचे वारसा हक्क, लग्न संमती, अपत्यप्राप्ती, नोकरी, घटस्फोट या बाबतीचा अधिकार बाबासाहेबांमुळे सर्वच स्त्रियांना प्राप्त झाला .नोकरी करणारी महिलांना गरोदरपणा साठीच्या पगारी रजेचा अधिकार आहे या भावनेतून कायदा संमत करून घेऊन बाबासाहेब तमाम स्त्रियांच्या पित्याची भूमिका पार पाडताना दिसतात .

हिंदू -कोड बिलामुळे सोयी -सुविधा,सुरक्षितता उपभोगणार्या ,स्त्रियांच्या  परिवर्तनवादी  चळवळीशी कोणतेही देणे घेणे नसलेल्या सवर्ण महिलांना सामाजिक आत्मभान किती आले हा खरा प्रश्न आहे ? आज परिवर्तनवादी  चळवळीतील महिलांना आपले खरे   उद्धारक  असलेल्या शाहू-फुले -आंबेडकर यांच्या विषयी जी आत्मीयता आहे ती सवर्ण समाजातील इतर महिलांना का नाही ? त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम व योगदान तर सोडाच पण वर्षाकाठी येणाऱ्या या महापुरुषांच्या जयंती – पुण्यतिथिची पुसटशी कल्पनाहि या महिलांना नसते व त्यांच्या जयंत्या सुद्धा या महिला साजर्या करीत नाहीत .

डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेले एक वाक्य इथे आठवते ” तुम्ही ज्या समाजात जन्म घेता त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे “असे असताना ज्या क्रांतीबा फुलेंनी समग्र स्त्री जातीच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश दाखविला ते ज्या माळीसमाजातून आले त्या माळी समाजातील महिलांनी फुलेंची जयंती अतिशय धुमधडाक्यात साजरी केली असे आजवर ऐकिवात नाही तसेच,शाहू महाराजांचे हि ते ज्या मराठा समाजातून आले त्या मराठा समाजातील महिलांनी हि शाहूंची जयंती विचारानुप साजरी केल्याचे चित्र कधी पहावयास मिळाले नाही मग डॉ. बाबासाहेबांची जयंती करणे तर दूरच राहिले.

खर्या अर्थाने परिवर्तनवादी स्त्रियांच्या चळवळीची पायाभरणी करणाऱ्या आंबेडकरी समूहातील स्त्रिया आपले प्रेरणास्थान असणाऱ्या शाहू -फुले-आंबेडकर यांची जयंती दिवाळी-दसर्या पेक्षा मोठा सन असल्या प्रमाणे करतात व त्यांचे विचार पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात  हे आपण पाहतो. हि दोन्ही दृश्य पाहून एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू असे आहे, ह्यावर विचार होणे गरजेचे आहे.

स्त्रीयाची परिवर्तनवादी चळवळ फक्त स्वताच्या  पुनरुत्थानासाठी  सक्रिय ना राहता   परिवर्तनवादी  चळवळी बाहेर असणार्या इतर सर्व समाजातील स्त्रियान साठी हि सक्रिय राहिली. शतकानु शतके गुलामगिरी व अस्पृश्यता आणणाऱ्या सवर्ण वर्गातील महिलांसाठी सुद्धा लढा देऊन त्यांना समाजातील दुय्यम स्थानातून हात देऊन परिवर्तनवादी  चळवळीतील स्त्रियांनी बाहेर काढले. काही दशकांपुर्वीच घडलेला हा ताजा इतिहास समोर असताना आज अनेक सवर्ण स्तीर्यांचे पक्ष वा संघटन  मात्र दलित वर्गातील स्त्रीयाव्र झालेल्या अत्याचार संदर्भात पेटून उठताना ,आंदोलने करताना ,सरकार दरबारी प्रश विचारताना कुठेही दिसत नाहीत. हे का व्हावे  असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही  .

 सोलापूरच्या तेलगावातील दलित महिलेची विवस्त्र धिंड ,इंदापूर मधील दलित महिलांच्या आश्रम शाळेवर पडलेला दरोडा आणि बलात्काराची घटना ,खैरलांजीतील आई व मुलीवर संपूर्ण गावाने  बलात्कार करून  संपूर्ण कुटुंबाची केलेली हत्या ,नुकतीच बारामतीत चोरीच्या संशयावरून मातंग समाजातील मुलीला विवस्त्र करण्याची घटना या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व हृदयद्रावक घटनाच्या विरोधात समाजातील कुठलीही सवर्ण स्त्री आवाज उठवताना , साधा निषेध नोंदविताना हि दिसत नाहीत .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे हक्क व अधिकार मिळूनहि या स्त्रियांच्या डोक्यातील जातीयता संपलेली नाही 

शहरी भाग बरोबरच ग्रामीण भागातील स्त्रीयावर होणार्या बलात्काराच्या वाढत्या घटना ,स्त्री भरून हत्येचे वाढते प्रमाण,हुंडा बळी व कौटुंबिक हिंसाचारात मृतुमुखी पडणाऱ्या स्त्रियांचे वाढते प्रमाण ,नोकरीच्या ठिकाणी महिलांचे होणारे मानसिक व शाररीक शोषण,अधिकार पदावर कार्यरत असणाऱ्या महिलानाही केवळ स्त्री म्हणून दिले जनरे स्थान,वागणूक आणि अलीकडेच मोठ्या प्रमाणात समोर येणाऱ्या बाल-लैंगिक शोषणाच्य घटना या सर्व गोष्टीतून पुरुषी विकृतीचे दर्शन होताना दिसते .पुरुषांमध्ये असलेल्या स्त्री बद्दलच्या दुय्यम व  हिणकस भावनेला इथल्या धर्मव्यवस्थेने स्त्रीचे केलेले अवमूल्यन हेच कारणीभूत आहे .कारण स्त्री हि केवळ उपभोगाची व उपयोगाची वस्तू असे धर्म व्यवस्था सांगते .याच धर्म व्यवस्थेमुळे आज दलित, अल्पसंख्यांक कष्टकरी  मागास्वर्गीय,आदिवासी समुदायातील महिलांच्या केवळ जातीय मानसिकतेतून होणार्या अन्याय -अत्याचाराच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते तेव्हा केवळ स्त्री या भावनेतून तिला मदतीचा हात देण्याची गरज असताना तसेच डॉ .बाबासाहेबांनी इथल्या पुरुषी सत्तेच्या आणि धर्मांधतेच्या जोखडातून स्त्रियांना मुक्त करत संविधानाच्या माध्यमातून तिला माणूस म्हणून बहाल केलेले स्वातंत्र्य ,न्याय या गोष्टी अबाधित ठेवण्य ऐवजी आज काही स्त्रियांच्या संघटना महिलांना पुन्हा धर्म व्यवस्थेच्या ,गुलामीच्या चौकटीत अडकवण्यासाठी गोंडस नवे देऊन आंदोलने करताना दिसतात ,शनीच्या चौथार्यावर स्त्रियांना प्रवेश मिळालाच पाहिजे ,देवळाच्या गाभार्यात स्त्रियांना प्रवेश द्या ,,पुजारी म्हणून स्त्रियांची नेमणूक करा असे विषय घेऊन स्त्रियांना पुन धार्मिक कर्मकांडात गुंतवून ठेऊन त्यांचा वैचारिक ,सामाजिक आणि विज्ञाना धीष्ठीतविकास खुंटीत करण्याचे काम करत आहेत

              २१ व्या शतकात स्त्रियांच्या प्रगतीच्या ,सारासार विवेकाच्या कक्षा रुंदावत असताना आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन काम कार्नायचे धेय्य बाळगत असताना लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन तिचे मनोबल उंचावताना दिसून येते नी त्याच वेळी पुरुषाप्रमाणेच स्त्रीला  आचार -विचार -संचार आणि पेहराव स्वातंत्र्य  बहाल केलेले असताना सिंधुताई साप्कालान्सारख्या स्त्रीने  ” तोकडे कपडे घातल्यावर बलात्कार होणार नाही तर काय सत्कार होतील का ?” असा अविवेकी विचार मांडणे खेद जनक आहे .पुण्यात ७५ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार झाला,पुण्यातच ७ महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला,दिल्लीत निर्भायावर बलात्कार झाला   स्कूलबसमध्ये चिमुरडीवर बलात्कार झाला यापैकी कुणीच तोकडे कपडे घातले नव्हते. भारतीय महिलांच्या तुलनेत परदेशी महिलांचे कपडे अधिक तोकडे  असतात किंबहुना तिकडे नैसर्गिक गरज असणाऱ्या सनबाथसाठी तर  समुद्रकिनारी त्या बिकीनीच घालतात तेव्हा त्यांच्यावर बलात्कार होत नाहीत. कारण तिथल्या समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा स्वतंत्र माणूस म्हणून आहे. यासाठी जबाबदार असणारी पुरुषी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी  सिंधुताई सारखी स्त्री जेव्हा असे विधान करते तेव्हा   “कुर्हाडीचा दांडा ,गोतास काळ ” हि प्रचीती येते .

एकूणच काय तर अशाप्रकारे स्त्रियांना त्याच चुकीच्या आहेत असे भासवून त्यांना पुन्हा कर्मकांडा कडे नेउन  आपले हित साधण्यासाठी ,एका विशिष्ट समूहाला खुश करण्यासाठी  काही सवर्ण समाजातील स्त्रिया आंबेडकरी स्चालावालीतील स्त्रियांपेक्षा डाव्याच ठरतात . विरोधाभास निर्माण करून हेतू पुरस्सर  स्त्रीवादी चळवळीची दिशा चुकविणाऱ्या या दांभिक प्रसिध्द असणाऱ्या स्त्रियांचे विदारक चित्र समोर असताना ‘स्त्री परिवर्तनवादी चळवळीचा रथ’ हा केवळ आणि केवळ डॉ.बाबासाहेबांच्या विचारांमुळे आत्मभान आलेल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक  समुदायातील स्त्रियाच  खर्या अर्थाने पुढे नेताना दिसत आहे .

सुवर्णा डंबाळे

Related posts