डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन

मिशन ओळख (Mission Introduction) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवताभूषण, समताभूषण, विश्वभूषण ठरावं असं भारतभूमीचं अनमोल रत्न! घटनाकार, ज्ञानवंत, किर्तीवंत, लढवय्या, समतायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर! डॉ. भीमराव रामजी आंबेडकर… डॉ. बी. आर. आंबेडकर या महामानवाच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाच्या अलौकिकतेचा किती म्हणून गौरव करावा? शब्दच अपुरे पडणार..! त्यांच्या प्रकांडपांडित्याच्या विचारवैभवाचं इंद्रधनू नि त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमहात्म्य…! विद्वत्तेचं अद्भूत रसायन… ज्ञनाचा महासागर, आकाशाला गवसणी घालू पाहणाया चिंतनाचा महामेरू…समताधर्मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथलेखक डॉ.…

Read More

महानायकाला विनम्र अभिवादन, नागपुरात लोटला भीमसागर

14 एप्रिल : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती… मानवता आणि समनतेचा संदेश देणार्‍या महामानवाला सगळीकडेच ‘जय भीम’चा नारा देत मानवंदना दिली जात आहे. जगभरात मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंतीला सुरुवात झालीये. ठिकठिकाणी दलित बांधवांनी रात्री 12 च्या सुमारास आपल्या घरावर निळा झेंडा लावून महामानवाला अभिवादन केलं. मुंबई, औरंगाबाद, नागपूरमध्ये सकाळपासून रॅली काढून महानायकाला अभिवादन केलं जात आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी भीमबांधवांनी अलोट गर्दी केली आहे. सातासमुद्रापार जयभीमचा जयघोष बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जय भीमचा नारा सातासमुद्रापलीकडे निनादला आहे. न्युयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये सगळ्या भारतीयांनी एकत्र…

Read More

महामानवाची 125 वी जयंती, वाळूशिल्प-रांगोळीतून बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आज देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने रात्रीपासूनच दादरच्या चैत्यभूमीवर भीमसैनिकांनी गर्दी केली आहे. लाखो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 500 पोलिसांच्या जोडीला एसआरपीएफचं पथकं देखील तैनात करण्यात आलं आहे.   चैत्यभूमीवर ‘भीमपहाट‘ कार्यक्रम  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या ‘कॉफी टेबल बुक’ या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात येणार आहे. चैत्यभूमीजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव…

Read More

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करावे -प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

सातारा दि. 13 –  लोकशाही मुल्यांच्या सबलीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आज केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती,समता व सामाजिक न्याय वर्ष निमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यावतीने राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आज येथील नियोजन भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. पाटणे मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी पी.बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, उपजिल्हाधिकरी (महसूल) भारत वाघमरे, तहसीलदार चंद्रशेखर सानप…

Read More

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीतून साकारणे हिच खरी आदरांजली – जिल्हाधिकारी

अलिबाग : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून साकारणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी पनवेल येथे केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समता व सामाजिक न्याय वर्ष 2015-16 साजरे करीत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वनसंरक्षक अलिबाग श्रीमती ज्योती बॅनर्जी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पेणच्या प्रांत अधिकारी…

Read More

पिंपरी महापालिकेत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त रेखाटली सुरेख रांगोळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त राजश्री जुन्नरकर या रांगोळी कलाकाराने सुरेख रांगोळी रेखाटली आहे, जी महापालिका इमारतीत येणा-यांना आकर्षित करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी चौकातील त्यांच्या पुतळयास महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बु आसवानी व आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, पिंपरी येथे आज…

Read More

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त नवीन इलेक्ट्रिक बोअरचे उद्घाटन

नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा उपक्रम  प्रतिनिधी सोलापूर : प्रभाग क्र. २६ अ कोनापुरे चाळ येथे जयभारत तरूण मंडळ शेजारी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे व स्थानिक प्रभागातील महिला यांच्या हस्ते नवीन इलेक्ट्रीक बोअरचे उद्घाटन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत्या पाण्याची टंचाई लक्षात घेवून प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी आपल्या विकास निधीतून नवीन इलेक्ट्रीक बोअर घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जॉन फुलारे, रवि असादे, बाबू बलझेंडे, जॉन अलझेेंडे, नागनाथ म्हेत्रे, राजू दिवेकर, मंगेश शिंदे, सायबण्णा दिवटे,…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती सोहळ्यास दिमाखदार प्रारंभ

महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानून बाबासाहेबांनी समतेचे तत्व प्रस्थापित करणारी राज्यघटना देशाला दिली. त्या राज्यघटनेचा सन्मान करीत आपले आचरण असायला हवे, असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनापासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत ११ ते १४ एप्रिल २०१६ या कालावधीत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये चार दिवस संपन्न होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करत होते. याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका…

Read More

ठाणे महानगरपालिका साजरी करणार १० दिवस डॉ. आंबेडकर जयंती

ठाणे, १२ एप्रिल, (हिं.स.) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असून हा जयंती उत्सव १४ एप्रिल २०१६ ते २५ एप्रिल २०१६ या कालावधीत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय भाऊराव मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका शाळांमधील मागासवर्गीय समाजातील १०वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १० विद्यार्थ्यांसाठी १० हजार रूपयांच्या शिष्यवृत्तीची योजना सुरु करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती पनवेल नगरपरिषदेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या या परिषदेस ज्येष्ठ नगरसेवक जयंत पगडे, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभपाती सीता पाटील, मागासवर्गीय कल्याण समितीचे सदस्य प्रकाश बिनेदार, नगरसेवक शिवदास कांबळे आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा चारूशिला घरत यांनी पत्रकारांना माहिती देताना पुढे सांगितले की, गुरूवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ धार्मिक विधी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येर्इल. त्यानंतर त्याच ठिकाणावरून चित्ररथ, ढोल, लेझिम पथकासह पनवेल शहरात…

Read More

आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधनावर भर – वाडेकर

पुणे – घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात जास्त सामाजिक प्रबोधनावर भर दिला जाईल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साऱ्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती साजरी करणे प्रत्येक नागरीकांचे आद्य कर्तव्य आहे. या अनुशंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी सुध्दा विविध उपक्रमाचे आयोजन करुन जयंती महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ चे उद्घाटन

दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची यशस्वी वाटचाल विश्वरत्न बाबासाहेबांच्या दिव्य स्वप्नातील दादरला साकारणार १७ मजली अत्याधुनिक भवन मुंबई / अजेयकुमार जाधव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २६ जुलै, १९४४ रोजी ‘दि बॉम्बे शेडय़ुल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ आणि आता ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ या नावाने ओळखली जाणारी संस्था स्थापन केली. समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱया आपल्या समाजबांधवांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या गुणात्मक व जीवनाचा स्तर त्यासोबतच वैचारिक दृष्टय़ा व्यापक विचारांची संस्था असावी, यासाठी ही संस्था स्थापनेचा उद्दिष्ट होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘दि पिपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ चे मार्गदर्शक रत्नाकर गायकवाड यांच्या…

Read More

बाबासाहेबांची आंतरराष्ट्रीय कीर्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित शोषित, पिडीत समाजाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा विविध देशातील शोषित पिडीत जनतेच्या उत्थानाच्या दृष्टीने जगाला प्रेरक ठरला आहे. त्यांचे विचार आणि कार्य हे देशाला आणि जगाला सर्वांगीण विकासाच्या मार्गाला घेऊन जाणारे आहेत याची जाणीव जगातील अनेक अभ्यासकांना होऊ लागली आहे. यासंबंधीचे एक अत्यंत महत्वाचे हंगेरियन लोकांचे उदाहरण आहे. हंगेरियन लोकांवर प्रचंड प्रभाव श्वेत हंगेरियन डेरडाक टिबोर (Derdak Tibor) हे हंगेरी देशातील एक समाजसुधारक आहेत. टिबोर हे २००४ मध्ये फ्रांसमध्ये गेले होते. फ्रांसची राजधानी असलेल्या पॅरीस शहरातील एका बुक स्टॉलवर फ्रेंच लेखक ख्रिस्तोफ जेफरलोट (Christophe Jaffrelot)…

Read More