COMPETITIONS

ऑनलाईन स्पर्धा

भीम जयंती डॉट कॉम च्या माध्यमातून विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये 11 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा निकाल 7 मे रोजी जाहीर करण्यात येईल.

प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये रोख, तृतीय पारितोषिक 2 हजार रुपये रोख आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके 1 हजार रुपये रोख प्रत्येकी असे असेल. एक स्पर्धक अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतो. प्रत्येक स्पर्धेचे नियम अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

Instagram Reels स्पर्धा

Instagram Reels स्पर्धेसाठी विषय :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत कुठल्याही विषयावर आपण Reels बनवू शकता.

वक्तृत्व स्पर्धा 

वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय :

1. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. भारतीय महिलांच्या उत्थानात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान.

काव्य लेखन स्पर्धा

काव्य लेखन स्पर्धेसाठी विषय :

काव्य लेखन स्पर्धेसाठी नियोजित विषय नाही. मात्र कविता सामाजिक आशयाची आणि आंबेडकरी विचारधारेशी निगडीत असावी अशी अपेक्षा आहे.

भीम गीत गायन स्पर्धा (एकल)

भीम गीत गायन स्पर्धेसाठी विषय :

कुठलेही भीमगीत चालेल.

भीम गीत गायन स्पर्धा (समूह)

भीम गीत गायन स्पर्धेसाठी विषय :

कुठलेही भीमगीत चालेल.

ऑनलाईन नृत्य स्पर्धा (एकल)

केवळ भिमगीतावर आधारित नृत्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

ऑनलाईन नृत्य स्पर्धा (समूह)

केवळ भिमगीतावर आधारित नृत्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

चित्रकला स्पर्धा

चित्रकला स्पर्धेसाठी विषय :

1. सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संदेश

ऑनलाईन निबंध स्पर्धा

निबंध स्पर्धेसाठी विषय :

1. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आणि उपाय.

2. भारतीय समाजात संविधानातील लोकशाही मूल्ये रुजविण्याचे मार्ग, अडथळे आणि उपाय.

ऑनलाईन रांगोळी स्पर्धा

रांगोळी स्पर्धेसाठी विषय :

1. फुले – शाहू – आंबेडकर

2. मार्गदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संपर्क

अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

Scroll to Top